प्रशालेतील शालेय क्रीडा स्पर्धा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षिका व शिक्षक यांचा जनसेवा शिक्षण व समाजसेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.आर. एन.कुलकर्णी स तसेच सचिव परशुराम महालकरी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा संपन्न झाला. पावसाळी शालेय तालुका स्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये उज्वल यश मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे,सहावी मधील -कन्हैया लांडे -द्वितीय, तुळजाराम धोत्रे,चौथा-रोहन खांडेकर, मुली मध्ये सातवी मधील ईश्वरी कोंडूभैरी,तृतीय, सोनाक्षी जाधव, चतुर्थ-सहावी मधील समृद्धी माळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील सातवी मधील यशस्वी विद्यार्थी प्रज्ञा जुदळे, प्रथम सानिका सावंजी तृतीय,पाचवी शिष्यवृत्ती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी,श्रेयश पवार 260/298,वेदांत गडदे-258/298,राजवीर काळुंगे 248/298,संस्कृती ढाणे 236/298 श्रेयस नागणे – 232/298 श्रेयश चौगुले 226/298, अभिषेक गवळी 216/298, सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक आर. एन.कुलकर्णी यांनी प्रशालेच्या प्रगतीची माहिती सांगितली.तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांची भूमिका महत्वाची आहे. हे सांगितले. प्रशालेचे सहशिक्षक शिवाजी कोंडुभैरी यांनीही शाळेच्या भूतकाळातील काही सुखद अनुभव कथित केले. प्रशालेचे पालक वासंती जुदळे यांनी मुलांच्या प्रगतीमध्ये शिक्षक खूप कष्ट घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होताना दिसत आहे. अशा भावना व्यक्त केल्या. प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा कुलकर्णी, संदीप माळी ,सचिन घोडके यांचा हि संस्था व प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे पालक संभाजी नागणे यांना झेप परिवार यांच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. एन.कुलकर्णी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिस्टर सरपंच प्रकाश काळुंगे त्यांचाही अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी दामाजी माळी, प्रवीण पवार, संजय चौगुले, तानाजी सावंजी,सतीश ढाणे,राजेंद्र गवळी,दत्तात्रय खांडेकर,जाधव मॅडम,जुदळे मॅडम कोंडुभैरी मॅडम,गडदे मॅडम,पवार मॅडम,धोत्रे मॅडम, हे सर्व पालक, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिद्धेश्वर पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षिका, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.