पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

गाव चलो अभियानांतर्गत आ. आवताडे यांनी साधला जनतेशी संवाद

मंगळवेढा(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियानांतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भोसे या गावी मुक्कामी राहून या भागातील जनतेशी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी संवाद साधून विविध बाबींवर सखोल चर्चा केली आहे. सदर अभियानादरम्यान आ. आवताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकार व महायुती सरकारच्या कालखंडातील राज्यामध्ये राबवण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची व विकास कामांची माहिती जनतेला देत त्यांच्या आणि अडचणी व समस्या जाणून घेतल्या.या भागातील ज्येष्ठ नागरिक मंडळींशी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अवताडे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणले.                                                                भोसे गावचे सुपुत्र शहीद जवान सुधीर घाडगे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अवताडे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

आमदार समाधान आवताडे यांनी भोसे गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेट देत शिक्षक व विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण प्रणालीसाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत असणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना माहिती देऊन दोन्ही शाळांतील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. त्याचबरोबर निरनिराळ्या सामाजिक संस्थांना भेटी देत संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सामाजिक कार्यक्रमांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला आहे. गावातील विविध वाड्या-वस्त्यांवर जाऊन आमदार आवताडे यांनी नागरिक जनतेच्या गाठी भेटी घेतल्या आहेत.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या विविध बचत गटांना त्यांनी भेट देत उपस्थित महिला भगिनींच्या अर्थकारण संदर्भात असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर लवकरच सर्व समावेशक कार्य करणार असल्याचे सांगितले. या भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशा वर्कर यांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या मागण्या संदर्भात आपण शासन दरबारी आपला आवाज पोहोचवणार असल्याचेही सांगितले. देशात व राज्यात सर्वसामान्य जनतेचे स्वप्न साकार करणारे सरकार असल्यामुळे अनेक लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

 

या अभियानत भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच,उपसरपंच, बुथ प्रमुख, प्रवास कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील व विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close