मंगळवेढा-अनेक वर्षे एकमेकांपासून दूर गेल्यावर माणसाची किंमत कळते. त्यांच्यामधील आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे तेव्हाच उमगते. अगदी अशाच प्रसंगास सामोरे जाण्याची वेळ मंगळवेढा येथे 26 वर्षापूर्वी एकत्र शिक्षण घेतल्यानंतर एकमेकांपासून दुरावलेल्या मित्रांवर आली. निमित्त होते मंगळवेढा श्री संत दामाजी हायस्कुल येथील 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे 1996-97 मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या वर्गमित्रांची तब्बल 26 वर्षांनी श्री संत दामाजी महाविद्यालय येथील नियोजित ठिकाणी गळाभेट झाली. शालेय जीवनातील टोपण नावाने हाका मारत व शाळेतील आठवणींना उजाळा देत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला.
या स्नेहमेळाव्यानंतर अखेर सांगता झाली.यावेळी मधु स्वामी, विनायक निराळे,सतिश सुरवसे,सुर्यकांत कनेरी,महेश ढेकळे,श्रीकांत नाझरकर,आण्णासाहेब इंगळे,बिरा माईनकर,दत्तात्रय येळे,नितिन इकारे,किरण माने,विजय माळी,सिताराम भुसे,अस्लम इनामदार,अविनाश पाटील,आण्णा घोळसंगी,युवराज चिंचकर,संजय पवार,कल्याण पाटील,माधुरी माळी,सविता माळी,शारदा माळी,अर्चना पाटील,सिमा सावंत,दिपाली राजमाने,वंसुधरा बुटे,शैलजा फटे,मंदाकिनी गडदे,राधिका नागणे,उषाराणी ढेकळे,रेश्मा मुजावर, मिनाक्षी हेंबाडे,गुलशन मुजावर,दिपा पट्टनशेट्टी,रुपाली होनराव,दिपाली होनराव,शितल चिंचकर,सविता भगरे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय सुचना महादेव धोत्रे,प्रस्तावीक अनिता नागणे सूत्रसंचालन मल्लमा बुगडे तर आभार संजय काटकर यांनी मांडले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.