पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसोलापूर
नगरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांची मंगळवेढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयास भेट!
मंगळवेढा(प्रतिनिधी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगरचे आंदोलनवीर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी मंगळवेढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिली यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्याप्रसंगी त्यांच्या सत्कार जिल्हा संघटक युवराज घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
सततची नापिकी, अतिवृष्टी यासह विविध नैसर्गिक आपत्तीत शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत किंवा शेतीकडे पाठ फिरवत आहेत. हा भविष्यातील गंभीर धोका आहे.उमेद हरवून बसलेल्या शेतकऱ्यांत बळ निर्माण करण्यासाठी शेतकरी नेता म्हणून राज्यात एकमेव राजू शेट्टी लढा देत आहेत असे प्रतिपादन आंदोलनवीर रवींद्र मोरे यांनी केले. यावेळी नवनाथ दूध संघ राहुरी चेअरमन दादासाहेब शिंदे अरुण फलके, भरत फलके, बापूसाहेब कलुबर्मे आदि उपस्थित होते