मुंबई(प्रतिनिधी) राज्यभरातील सर्वच महानगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये ४० हजार नोकऱ्यांचे विविध पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील सर्वच महानगरपालिका, यासोबतच ‘अ’ वर्ग नगरपालिका यांच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भरतीाबाबतचे निर्देश दिले आहे. मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभाग अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल हे ही बैठकीत हजर होते. राज्यातील सर्वच महानगरपालिका, नगरपरिषदा, पंचायती यामध्ये 55 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. राज्यपातळीवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान 40 हजार विविध पदांबाबतची भरतीसाठीची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात यावे, असा आदेश मुख्यंत्र्यांनी यावेळी दिला. यात राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयाकडून आणि नगरपरिषद – नगरपंचायत पातळीवरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ यामध्ये एकूण 3720 पदांची भरती होणार आहे. याबाबतची प्रक्रिया एकूण 34 जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत निवड समितीच्या वतीने पार पडण्यात येणार आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 8490 पदांबाबत भरतीची प्रक्रिया सुरु केलेली असून, या भरतीच्या प्रक्रियेसबंधी कार्यवाही सुरू करुन, मे महिन्याच्या अखेरपर्यंतच्या मुदतीत संपूर्ण भरती करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रिक्त जागांबाबत आढावा घेत, सगळ्या बाबी पूर्ण करुन, भरती प्रक्रिया लगोलग सुरू करण्याचे आदेश आहेत.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.