प्रतापगडच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २५ कोटींची घोषणा!

पुणे(मा.का)प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिनास उत्साहात सुरुवात झाली. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. महादेव जानकर, आ. भरत गोगावले उपस्थित आहेत. मुख्यमंत्री यांचे तुतारी वाजवून ढोल- ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गडावर भवानी मातेची विधिवत पूजा व आरती मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रतापगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आजही या ठिकाणची माती पराक्रमांची साक्ष देत आहे. छ. शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. रयतेच्या गवताच्या काडीच्या देठाला हात लागता कामा नये, अशी महाराजांची भूमिका होती. रयतेच्या रक्षणासाठी असलेला एक राजा म्हणजे छ. शिवाजी महाराज होते.

शिवभक्तांची इच्छा, भावना व मागणी होती, या गडावरील अतिक्रमण हटले पाहिजे. परंतु आम्ही छ. शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सरकार स्थापन केले. सातारा जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचे मनापासून अभिनंदन करतो. न्यायालयाने जो निवाडा दिला होता, त्यानुसार प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. छ. शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे दर्शन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच आई भवानी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.