मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अरळी गावचे स्व.कलाप्पा शिऱ्याप्पा पांढरे या शेतकरी बांधवाने २२ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. सदर मयत वारसाच्या पत्नीस मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते गुरुवारी तहसील कार्यालय मंगळवेढा येथे धनादेश वितरीत करुन शासकीय अर्थसहाय्य करण्यात आले. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा जेव्हा असे टोकाचे पाऊल उचलतो तेव्हा मात्र मानवतेचे सर्व कंगोरे गळून पडतात. दुष्काळी तालुका असा कलंक माथी असणाऱ्या या मंगळवेढा तालुक्याचे नंदनवन होण्याचे दिवस अतिशय जवळ आले आहेत, त्यामुळे यापुढील काळामध्ये एकही शेतकरी आपल्या जीवाला मुकणार नसल्याचा विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त करुन स्व.पांढरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सदर प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, प्रांताधिकारी बी.आर.माळी तहसीलदार मदन जाधव,अशोक केदार, गंगाधर काकणकी आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.