मंगळवेढा(प्रतिनिधी)गडचिरोली व गोंदिया या अति संवेदनशील नक्षली भागात सुरक्षा मोहिमेत मोलाचे कामगिरी केल्या बद्दल केंद्र शासनाच्या वतीने मंगळवेढा येथील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सौरभ अभिमान शेटे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले. मूळचे मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील असलेले सौरभ शेटे यांनी यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाने विशेष सेवा पदक बहाल केले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युशन कॉलेज पुणे येथे झाले.
त्या ठिकाणी लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करून पोलीस दलात भरती झाले आतापर्यंत त्यांनी नवी मुंबई, गडचिरोली, गोंदिया,सोलापूर या ठिकाणी पोलीस दलात काम केले आहे सध्या ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
गेल्या वर्षभरात मंगळवेढा परिसरामध्ये अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या घटनेचा तपास लावण्यात पोलीस अधिकाऱ्यांना चांगले यश मिळालेले आहे त्यामध्ये त्या तपास प्रक्रियेत शेटे यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. उपनिरीक्षक सौरभा शेटे यांना केंद्र शासनाच्या पुरस्काराने मंगळवेढा पोलीस ठाण्याची मान उंचावली.शेटे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.