उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोर्टी ते वाखरी रस्त्याचे भूमिपूजन!

पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर येथील कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्य वळण रस्ता) या रस्त्याचे  भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून आज येथे करण्यात आले.
यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,   आ.समाधान आवताडे, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.राम सातपुते, माजी आ.प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रांत अधिकारी गजानन गुरव, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आदी उपस्थित होते.                        यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
श्री क्षेत्र देहू आळंदी पंढरपूर नेवासा पालखीतळ / मार्ग विकास आराखडा अंतर्गत तीर्थक्षेत्र मौजे पंढरपूर येथील कोर्टी ते वाखरी या ३ किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी रुपये 15 कोटी 27 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा कार्यारंभ आदेश 14 सप्टेंबर 2022 रोजी काढण्यात आला आहे. या रस्ता कामासाठी एकूण 35,923.37  चौ. मी.  क्षेत्र भूसंपादित करण्यात आले आहे.  यामध्ये खाजगी क्षेत्र 20553.88 चौ. मी.  व शासकीय क्षेत्र 14749.49 चौ मी. संपादित केले आहे.

या कामामध्ये भरावकाम, जी.एस.बी. काम, डब्ल्यू. एम. एम. काम, डी. बी., दोन पुलमोऱ्या बांधणे, रोड जंक्शन सुधारणा करणे, रोड साइड फर्न‍िचर करणे, गटार काढणे आदि कामांचा समावेश आहे. कामासाठी जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून संपादित जागा शासनाच्या ताब्यात आहे. पंढरपूर शहरामध्ये सद्यस्थ‍ितीत अनवली, कासेगाव, मंगळवेढा, सांगोला, टाकळी व कराड रस्ता येथून येणारी वाहतूक ही बाह्यमार्गाद्वारे जाणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बाह्यवळण रस्ता पंढरपूर शहरालगत करण्यात आला आहे.  रस्त्यावरून येणारी वाहतूक पंढरपूर नगरपरिषद हद्दीतून व उपनगरातून जात आहे. या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमिवर कोर्टी वाखरी रस्ता पर्यायी बाह्यवळण रस्ता म्हणून वापरला जाणार आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.