पंढरपूर(प्रतिनिधी) आयुष्यात सगळे संपल्यावर खरी लढण्याची सुरवात तिथून होत असते. जे आपल्या समोर येईल तो उद्योग सुरू केला पाहिजे. बिझनेस करत असताना त्यावर स्वतःच वैयक्तिक लक्ष दिले असलेले पाहिजे. त्या व्यवसायासाठी स्वतः वेळ देणे आवश्यक असते. आयुष्यात गती खुप महत्वपूर्ण असते याचबरोबर टार्गेट पुर्ण करण्याची धडपड ठेवली पाहिजे. कितीही संकट येऊ द्या त्या संकटाचा सामना जिद्दीने पुर्ण करायचा. आयुष्यात संकट येत असतात. ठरवलेले बदलायचे नाही. एखादा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहिले पाहीजे. कधी काय वापराचे हे ज्ञान उद्योजकांना असणे आवश्यक असते. लोकांची गरज लक्षात घेऊन स्टार्टअप केले पाहिजे. व्यवसाय करत असताना आर्थिक नियोजन परफेक्ट असावे. व्यवसाय करत असताना संगत खुप महत्वाची आहे. जगाची गरज लक्षात घेऊन उत्पादन करावे. सामाजिक जबाबदारी स्वीकारून उद्योग उभारणे गरजचे आहे. यामुधन उद्योगाची मोठी ओळख निर्माण होत असते. यातुनच चागंले काम केल्याचा आनंद मिळत असतो. समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने उद्योजक व्हावे. वारसा नसताना ही स्वतःच्या कर्तुत्वावर मी पुढे आलो आहे. उद्योग छोट्या तु सुरवात करा. जे जे करायचे ते सत्यात उतरवण्यासाठी ठाम रहा. आयुष्यात सगळे मिळते त्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मनातील न्यूनगंड काढून काम करा. उद्योजक चौकस बुद्धीचा असणे आवश्यक आहे. स्वप्न मोठे बघा आणि ते पुर्ण करण्यासाठी धडपड मेहनत करा. डोक्यात आयडिया असली की सर्व गोष्टी शक्य आहेत. हे सर्व करीत असताना टीम वर्क खुप आवश्यक असुन ते निर्व्यसनी असावे. एकञ येऊन उद्योज सुरू करा. यामध्ये एकमेकांचा विश्वास जपा. सगळ्या गोष्टी होत असतातसुरवात करा. संकट येत असतात त्यावर विजय मिळवायची ताकद तुम्ही निर्माण करा. मला माझ्या गावाचा विकास करायचे आहे. स्वतःची आयडिया वापरून आवडीच्या गोष्टीत करिअर करणे आवश्यक असून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे झाला तरच आपला देश समृद्ध बनेल असे मत उद्योजक अभिजित पाटील यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये स्टार्टअप याञेत बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर उद्यम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ना. फाऊंडेशन नवसंशोधन केंद्र, सोलापूर आयोजित “स्टार्टअप याञा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अभिजित पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन करून दिपप्रज्वलनने करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित डाॅ. सचिन लड्डा, उद्योजक अभिजित पाटील, सीईओ अमोल निटवे, उद्योजक सुरज डोके, अनुप देवकर यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
दरम्यान सोलापूर विद्यापीठातील उदमय प्रमुख डाॅ. सचिन लड्डा, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, अमोल निटवे, अनुप देवकर, उद्योजक सुरज डोके, उद्योजक अमोल देवकर आदी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात “इन्क्यूबेशन इनोव्हेशन सेल तसेच सोलापूर विद्यापीठ सोलापूर उद्यम फौंडेशचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी संदीप क्षिरसागर व दिशा होनमाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अतुल आराध्ये यांनी मानले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.