गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाची मुसंडी; स्वच्छ प्रशासन व सुशासन भाजपाच्या विजयाचा मूलमंत्र-माजी आ.नरेंद्र पवार
गुजरात(विशेष प्रतिनिधी) सातत्य पूर्ण विकास आणि स्वच्छ प्रशासन-सुशासन हाच भाजपच्या विजयाचा मूलमंत्र आहे.याच मुद्द्यावर जनता गुजरात विधानसभा पुनःश्च भाजपाला एक हाती सत्ता देतील यात शंका घेण्याचे कारण नाही असा विश्वास जललापूर विधानसभेचे प्रभारी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रचार सभांदरम्यान व्यक्त केला. जललापूर विधानसभेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार आर. सी.पटेल यांच्या निवडणूक प्रचार सभेवेळी ते बोलत होते.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, कामात पारदर्शकता असल्याने गुजरातमध्ये औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला असून या कामांच्या जोरावरच सलग सत्तेत येण्याचा विक्रम भाजपा करीत आहे. काल जलालपूर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आर सी पटेल यांच्यासमवेत मतदारसंघातील छीणम, कडोली, महूवर, नळोद, मरोली, पोसरा, वाडा, चोखड, कोलासणा, आसुंदर, कादीपूर, वेस्मा या गावांमध्ये जललापूर विधानसभेचे प्रभारी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रचार सभा घेतल्या. यावेळी पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर व नवसारी विधानसभेचे प्रभारी आ.कॅप्टन तामिल सेल्वन, उद्योजक ललित नहार, स्वामी नारायण ट्रस्टचे स्वामी हरी जीवन,पंचायत समिती सभापती संजय पटेल,उपसभापती मिनेश पटेल,पंचायत प्रमुख तृप्ती बेन, किसान मोर्चा अध्यक्ष दिपकभाई देसाई, दानवीर अमितभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष मुकेशभाई कांगुडे, आणि सर्व गावांचे सरपंच उपस्थित होते. तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकमोठ्या संख्येने उपस्थित होते.