मंगळवेढा(प्रतिनिधी) कर्नाटक राज्याची विजापूर आगाराची विजापूर- पंढरपूर ही मुक्काम बस सेवा चालू होती ती मागील 2-3 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी, तळसंगी, भाळवणी, निंबोणी, चिखलगी, मारोळी ई. गावातील प्रवाश्यांना ती एसटी बस सोयीची होती, परंतू सदरची एसटी बस बंद झाल्यामुळे वरील गावांतील विद्यार्थी,त्या मार्गावरील कर्मचारी व प्रवाश्यांची फारच गैरसोय होत होती त्यामुळे पंढरपूर आगाराची पंढरपूर – विजापूर ही एसटी बस पंढरपूर हुन सकाळी 8 वाजता सोडण्यात यावी व ती एसटी बस सुमारे 1 वाजता विजापूरला पोहचेल, विजापूर हून सदरची बस 2 वाजता विजापूर पंढरपूर अशी केल्यास मंगळवेढा तालुक्यातील वरील मार्गावरील गावांच्या प्रवाश्यांच्या सोयीची होईल या दृष्टिकोनातून श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती व सातत्याने याचा पाठपुरावा केला असता या मागणीला यश आले आहे तरी सदर बस सेवा पूर्ववत रित्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या कडून समाधानाची प्रतिक्रिया नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.