पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित!

विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे पक्षप्रवेश सोहळा!

अकलुज(प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने महाविकास आघाडीकडून मिळालेल्या दहा जागांपैकी नऊ जागांवर आपले उमेदवार घोषीत केले आहेत. मात्र पवारांनी अद्यापही माढा लोकसभेत आपला उमेदवार घोषीत केला नाही.                                                                                           अशातच माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याठिकाणी भाजपने पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज असल्याची माहिती आहे. यातच आता मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब होणार असल्याने भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अकलुजच्या मोहिते पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार हे आता अखेर निश्चित झालं आहे.मोहिते पाटील कुटुंबीयांच्या निकटवर्तींनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली.

अकलुजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल.या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहिती शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिलीय. मोहिते पाटीट कुटुंबीय घरवापसी करणार असल्याने भापजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.