मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागात असणाऱ्या लवंगी गावात उभारलेल्या भैरवनाथ शुगरने स्थापनेपासून ते आजपर्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला प्रवास अत्यंत खडतर आहे. अशा परिस्थितीत देखील आम्ही ऊस उत्पादक शेतकरी,कारखान्यातील कामगार यांचे हित जपले आहे. या वर्षीच्या गळीत हंगामात पाच मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते आम्ही निश्चित पूर्ण करू असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे. भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यू-३ लवंगी या साखर कारखान्यामध्ये सन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक राज्याचे आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असून येणार्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाची जय्यत तयारी चालू आहे. कारखान्यातील मशीनरीचे ऑफ सीझन मधील ओव्हर ऑयलिंगची व इतर दुरुस्तीचे सर्व कामे प्रगती पथावर चालू आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले असून त्यांची मागील वर्षाचे कमिशन व देय बिलाचे वाटप झाले आहे. त्याच बरोबर त्यांना येणार्या गाळप हंगामासाठी पहिल्या हप्त्याची उचलही दिलेली आहे. येणार्या गाळप हंगामात कारखान्याने ४.५ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले असून त्यानुसार ऊस नोंदीचे कामही जवळपास पूर्ण केले आहे. कारखान्याने पाठीमागील सीझन २०२३-२४ चे एफआरपी पेक्षा जादा दर देऊन सर्व ऊस बिल दिलेले आहे. ज्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसाची नोंद कारखान्याकडे देण्याची राहिली असेल त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून ऊस नोंदी द्याव्यात असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी हनुमंत आसबे व सौ.सुहानी या उभयंताचे हस्ते धार्मिक विधी संपन्न झाला. यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, श्रीपती माने,रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, एचआर मॅनेजर संजय राठोड, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, शेतकी अधिकारी रमेश पवार,डे.चीफ केमिस्ट सिद्धेश्वर लवटे,चीफ अकौंटंट देवानंद पासले, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, ईडीपी मॅनेजर गजानन माने-देशमुख, स्टोअर किपर केदार साबणे, इलेक्ट्रिक इंजिनीअर योगेश डोके, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिसरातील शेतकरी व ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.