भैरवनाथचे अनिल सावंत यांनी 2500 गणेश मूर्तीचे वितरण करून केले राजकीय श्री गणेशा!

मंगळवेढा(प्रतिनिधि)सध्या राज्यात विधानसभेच्या तयारीचे राजकीय वारे वाहत असतानाच याच धामधुमीत राजकीय श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात 2500  घरगुती गणपतीचे वाटप करून राजकीय श्रीगणेशा केला.

       विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सध्या अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होऊ लागले आहेत. इच्छुकांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना त्यातून आपली राजकीय मोर्चे बांधणी करत असताना त्या त्या उमेदवाराला राजकीय राजश्रय असणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघात सध्या भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे दावेदार मानले जात आहेत त्याचबरोबर सर्वाधिक इच्छुक हे तुतारीकडून असून त्यामध्ये भगीरथ भालके, भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, पंढरपूर येथील सुभाष भोसले, नागेश भोसले, वसंत देशमुख मंगळवेढा येथून राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील हे इच्छुक आहेत मात्र विधानसभा निवडणुकीचा आखाडा अद्याप जाहीर झाला तरी राजकीय आखाड्याचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने उद्यापासून सुरू होणाऱ्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी मतदारसंघातील गणेशभक्त तयारीत असतानाच भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मतदारसंघातून 2500 गणेश मूर्तीचे वितरण करून आपला राजकीय श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न केला.अनिल सावंत हे विद्यमान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून ते यास मतदारसंघातून आमदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. लवंगी कारखान्यामुळे तालुक्यात ऊस गाळपाबरोबर बेरोजगारांना हाताला काम केल्यामुळे निवडणुकीसाठी त्यांनी यापूर्वी भोसे जिल्हा परिषद गटातून आपला राजकीय गट मजबूत करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबवले. आता विधानसभेत जाण्याचे मनसुबे असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात गणेश मूर्तीचे वितरण करून श्री गणेशा केला असला तरी शिवसेनेचा धनुष्यबाण की तुतारी याचा श्री गणेशा कधी करणार याची चर्चा मात्र या निमित्ताने मतदारसंघात सुरू झाली आहे

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.