मंगळवेढा(प्रतिनिधी) नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील बाळू महादेव माळी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांनी केली. यावेळी या दु:खद प्रसंगी सहवेदना व्यक्त करून माळी कुटुंबास या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली
बाळू महादेव माळी कुटुंबाचे जे नुकसान झाले आहे ते कधीच न भरून निघणारे आहे, ही घटना खरोखरच मानवतेच्या धर्माला आणि सामाजिक एकरूपतेला काळिमा फासणारी आहे असे भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत म्हणाले.भैरवनाथ शुगर चे संस्थापक मा.नामदार.प्रा.डॉ.श्री.तानाजीराव सावंत साहेव (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व भैरवनाथ शुगरचे चेअरमन.प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे. त्याच बांधीलकीतून आज असून फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांनी यावेळी बाळू महादेव माळी कुटुंबाला रु.एक लाखाची आर्थिक मदत जागेवरच देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळेस शिवसेना तालुकाअध्यक्ष अशोक चौंडे,बंडू जाधव,लवटेअण्णा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.