नवी मुंबई(प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आदेशानुसार उपनेते विजय नहाटा, जिल्हा प्रमुख विजय चौगुले,अशोक गावडे जिल्हा उपप्रमुख सुरेश कुलकर्णी व युवासेना प्रदेश सदस्य ममित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बेलापुर विधानसभा अध्यक्षपदी महेश कुलकर्णी यांचे नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये आपली निवड करण्यात आली असून आपण वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे असा शुभेच्छा देण्यात आले आहे. सदर निवडी नंतर बोलताना म्हणाले की ज्या धोरणांने बाळासाहेबांची शिवसेनेची स्थापना झाली आहे.त्या उक्तीप्रमाणे आपण गोरगरीब जनतेचे मुलभुत प्रश्नाबरोबर 80% समाजकारण व 20% राजकारण याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचार बाळासाहेबांची शिवसेना घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.
सदर कार्यक्रमास नवी मुंबईतील सर्व उप- जिल्हा प्रमुख,नगरसेवक,ज्येष्ठ नेते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.