मंगळवेढ(प्रतिनिधी) बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या विरोधात मंगळवेढ्यात महाविकास आघाडी मैदानात उतरली व प्रांत कार्यालयाच्या बाहेरील परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून मूक निषेध आंदोलन केले तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले
यावेळी सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे मुक आंदोलन पार पडल्यानंतर राष्ट्रवादी चे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांनी याबाबत बोलताना ही घटना घडली त्यांची नोंद पोलिसांनी घेतली नाही त्यामुळे ही कृती वारंवार घडत राहिली, पोलिसांची त्यांच्या वर्दीची भीती राहिली नाही, असं म्हटलं आहे. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे, बदलापूरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आंदोलन करणारे बाहेरचे होते, पण नंतर समोर आलं ती जनता ते आंदोलक बदलापूरमधील होते, ते आपल्या लेकीसाठी लढत होते, यातून सरकार कोणता विचार करतं ते लक्षात येतं, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख येताळा भगत यांनी केले तर शहरप्रमुख दत्तात्रय भोसले यांनी ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे,असं म्हणत राज्य सरकारवर हल्लाबोल केला यावेळी काँग्रेस मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे यांनी बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत संवेदनशील आहे, सर्व पालकांनी समोर आलं पाहिजे, असं काही घडत असेल तर ते समोर आलं पाहिजे, नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, असं यावेळी म्हटलं आहे.तर सर्व समाज माध्यमांनी हा विषय अगदी संवेदनशील पध्दतीन हाताळल्याने त्यांनी माध्यमांचे देखील आभार मानले, या मूक निषेध आंदोलनात काँग्रेसचे नंदकुमार पवार राहुल शहा मारुती वाकडे शिवसेना येताळा भगत दत्तात्रय भोसले संतोष रंदवे दिलीप जाधव जमीर इनामदार अय्याज शेख बापू अवघडे संदीप पवार शहाजी कांबळे आदी पदाधिकारी सहभागी होते
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.