आवताडे शुगरने २७११ रुपये प्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जमा- संजय आवताडे

मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील  ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता २७११ रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत. तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन  संजय आवताडे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आवताडे शुगर चा हा दुसरा हंगाम सुरू असून पहिला हंगाम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच दुसऱ्या हंगामामध्येही शेतकऱ्यांनी आवताडे शुगर वर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवठा केलेला आहे शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नसून शेतकरी हितासाठीच हा कारखाना आम्ही सुरू केला आहे. चालू हंगामात आवताडे शुगरने ३ लाख ९२ हजार ४६० मे टन उसाचे गाळप आज अखेर केले असल्याचेही सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मा. मोहन पिसे उपस्थीत होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.