मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील नंदुर येथे आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आवताडे शुगर्स अँण्ड डडिस्टिलरीज प्रा. लि. या खासगी साखर कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामात 24 दिवसात लाख गाळपाचा टप्पा पार करून दाखवला.
तालुक्यातील सहकारी व खासगी चार साखर कारखान्याने सुरू असून दोन वर्षे बंद असलेल्या या साखर कारखान्याने 4 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी पूजन करून प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ केला. तेव्हापासून 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कमी कालावधीत जास्त गाळपाचा उच्चांक केला.यावेळी बोलताना अध्यक्ष संजय आवताडे म्हणाले की कारखाना घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात युद्ध पातळीवर कारखान्याची सर्व यंत्रणा भरून कारखाना सुरू करण्यामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा आहे. या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे यांच्या कुशल सहाय्याने कमी कालावधीत आम्ही हा उचांक गाठू शकलो. या काळामध्ये तोडणी वाहतुक ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे कमी कालावधीत चांगले गाळप झाले असून शेतकऱ्यानी आवताडे शुगर वर जो विश्वास दाखवला तो विश्वासास पात्र राहून शेतकऱ्यांना समाधानकारक दर देऊन हा कारखाना शेतकऱ्यांचा असल्याचे दाखवून देणार असल्याचे म्हणाले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.