पंढरपूरमंगळवेढासामाजिक

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक व उद्योग कर्ज योजनाचा लाभ घ्या-आ.समाधान आवताडे

मंगळवेढा प्रतिनिधि: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व्यवसायिक कर्ज योजना मार्गदर्शन शिबिर शशिकांत नाना चव्हाण यांच्या मार्गदर्नाखाली आदित्य हिंदुस्तानी व शशिकला मुदगुल यांनी शनिवार पेठ येथे आयोजित करण्यात आले होते.

अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी भाजपा सरकारने देशभरात पंधरा कलमी कार्यक्रम लागू केले होते. सध्या या योजनेचा लाभ देशातील लाखो अल्पसंख्याक घेत आहेत. या १५ कलमी कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक अार्थिक विकास महामंडळाद्वारे थेट कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. असे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक बहुल महिला बचतगटांनाही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी.ए.बिराजदार यांनी दिली.

त्यावेळी भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, लेबर फेडरेशन चे संचालक सरोज काझी, उद्योजक आझाद दारुवाले, जिल्हा युवा मोर्चा चे सुदर्शन यादव, सुशांत हजारे , बाबा कौंडुभैरी, शिवाजी जाधव, सुरेश मेटकरी,झाकिर तांबोळी, शबिर रोंगिकर, झाकिर रोंगिकर, रियाज शेख, सोहेल रोंगिकर, शफिक बोकारि, शाबान शेख, अारिफ तांबोळी, जावेद सुतार, तनविर मनेरी , राहिल जमादार, सुलेमान रोंगिकर, सरफराज गोरी, अलताफ शेख, अफताब बोकारि, शरिफ शेख, जाविर तांबोळी, रेहान जमादार, गब्बर बोकारी, तय्ब गोरी, जुबेर रोंगिकर, अक्षय मुदगुल, सतिश मुदगुल उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close