अंत्यसंस्काराला हजेरी लावत आ.प्रणिती शिंदे ने नातेवाईकांचे केले सांत्वन!

मंगळवेढा(प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संपर्क साधून आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप व विरोधी उमेदवाराकडून सोडली जात नसतानाच आज आ.प्रणिती शिंदे यांनी दौऱ्यातून चिक्कलगी व शिरनांदगी येथील मयतांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली.

     ऊस तोडणीचे काम संपवून गावाकडे परतत असताना रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत लगमव्वा हेगडे,रितेश ऐवळे, नीलाबाई ऐवळे, तिघे रा. चिक्कलगी,तर शालनताई खांडेकर, रा. शिरनांदगी या चौघांचा मृत्यू झाला तर श्रीदेवी ऐवळे, नकुशा बिरुनगी,जयश्री ऐवळे, बनाव्वा बिरुनगी,लक्ष्मी ऐवळे, महानंदा केंगार ,धानव्वा ऐवले सर्व रा. चिक्कलगी, दत्तात्रय खांडेकर, बंडु बंडगर, दोघे रा. शिरनांदगी जखमी अवस्थेत आहेत या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आज दिवसभर या अपघाताबद्दल तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे याशिवाय मयत व जखमी असलेले  अतिशय गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी शेती व अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला. मात्र गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत घाला घातला आज झालेल्या अपघातामुळे त्यांच्यासमोर भविष्यातील ही रोजी रोटीचा प्रश्न समोर उभा टाकला आहे अशा परिस्थितीत सायंकाळच्या दरम्यान चौघांचे मृतदेह त्यांच्याशी शिरनांदगी व चिक्कलगी गावी आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आ. प्रणिती शिंदे या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने या भागात फिरत असताना दौरा अर्धवट सोडून मयतांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावत अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,रविकिरण कोळेकर,नितीन पाटील,गुलाब थोरबोले पांडुरंग जावळे,संदीप पवार,आदी उपस्थित होते

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.