मंगळवेढा(प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संपर्क साधून आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप व विरोधी उमेदवाराकडून सोडली जात नसतानाच आज आ.प्रणिती शिंदे यांनी दौऱ्यातून चिक्कलगी व शिरनांदगी येथील मयतांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
ऊस तोडणीचे काम संपवून गावाकडे परतत असताना रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत लगमव्वा हेगडे,रितेश ऐवळे, नीलाबाई ऐवळे, तिघे रा. चिक्कलगी,तर शालनताई खांडेकर, रा. शिरनांदगी या चौघांचा मृत्यू झाला तर श्रीदेवी ऐवळे, नकुशा बिरुनगी,जयश्री ऐवळे, बनाव्वा बिरुनगी,लक्ष्मी ऐवळे, महानंदा केंगार ,धानव्वा ऐवले सर्व रा. चिक्कलगी, दत्तात्रय खांडेकर, बंडु बंडगर, दोघे रा. शिरनांदगी जखमी अवस्थेत आहेत या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आज दिवसभर या अपघाताबद्दल तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे याशिवाय मयत व जखमी असलेले अतिशय गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी शेती व अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला. मात्र गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत घाला घातला आज झालेल्या अपघातामुळे त्यांच्यासमोर भविष्यातील ही रोजी रोटीचा प्रश्न समोर उभा टाकला आहे अशा परिस्थितीत सायंकाळच्या दरम्यान चौघांचे मृतदेह त्यांच्याशी शिरनांदगी व चिक्कलगी गावी आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आ. प्रणिती शिंदे या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने या भागात फिरत असताना दौरा अर्धवट सोडून मयतांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावत अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,रविकिरण कोळेकर,नितीन पाटील,गुलाब थोरबोले पांडुरंग जावळे,संदीप पवार,आदी उपस्थित होते