मंगळवेढा ही संताची भुमी आहे.या भुमीत अवैध धंदे चालू नयेत यासाठी मंगळवेढा-पंढरपुरचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी सत्तेत नसताना सभाग्रहात अवैध धंदे संर्दभात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.त्यावेळी सभाग्रहात तत्कालीन ग्रहमंत्री यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कामाची प्रशांस करत अवैध धंदे संर्दभात सगळ्यात जास्त कारवाई केले असून अवैध धंदे बंद असल्याचे उत्तर सभाग्रहात दिले होते. पंरतु लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यापासून अवैध धंदे नी हळूहळू डोके वर काढत ते आता नवीन वर्षात खुलेआम मटका चालु असल्याचे चित्र दिसत आहे. या मंथळ्याखाली MDNEWS मध्ये प्रसिध्द करण्यात आले होते या बातमीची जिल्हा पोलिस प्रमुख शिरिष देशपांडे यांनी दखल घेतली आणि सलग दोन दिवस स्थानिक गुन्हे शाखेने काही ठिकाणी छापे गुन्हे दाखल करण्यात आले.त्या अगोदरच मंगळवेढा शहरातील बुकी चालकाच्या मॕनेजर ने शहरातील मटका एंजटांना दोन दिवस जरा जपुन अश्या सुचना केल्यामुळे शहरातील मटका अचानक शहरातून गायब झाल्याचे चित्र सध्या तरी शहरात दिसत आहे. जिल्हा पोलिस प्रमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून केलेल्या कारवाई नागरिकांतून कौतुक होत आहे.परंतु स्थानिक पोलिस कडुन कागदावर किरकोळ गुन्हे दाखल करत आम्ही कारवाई केले असे दाखविले जाते. दरम्यान बुकी चालकाकडुन सोमवार पर्यंत जरा जपुन असे सुचना मटका एंजट यांना दिल्याचे समजत आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.