Uncategorizedपंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त अनुसंध्या कार्यक्रम आयोजन! मंगळवेढ्यात 29 रोजी ह.भ.प चैतन्य महाराज यांच्या कीर्तना बरोबर इडिंयन आयडल प्रतिक सोळसे व सुर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे यांच्या गाण्याची मैफिल!

मंगळवेढा(प्रतिनिधी) शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्यावतीने बहुजन रयत परिषद आयोजित स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तना बरोबर महाराष्ट्रातील इडिंयन आयडल प्रतिक सोळसे व कलर्स मराठी, सुर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम ही आयोजित केले असल्याची माहिती सावली फाऊंडेशन च्या अध्यक्षा अॕड.कोमल ढोबळे-सांळूखे यांनी दिली.        सदर कार्यक्रम मंगळवेढा येथील शिशुविहार समोरील शाहु मैदानावर ता.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता इडिंयन आयडल प्रतिक सोळसे व कलर्स मराठी, सुर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे यांच्या गाण्याची मैफिल होणार आणि त्यानंतर सायं 6 वाजता प्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार या कार्यक्रमाची स्थळ पाहणी करताना बोलल्या. या स्थळ पाहणी दरम्यान नियोजन समितीचे प्राचार्य चिदानंद माळी,मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार,मुख्याध्यापक विश्वभंर काळे मुख्याध्यापक प्रवीण गुंड,मुख्याध्यपक अंबादास पांढरे,कृष्णदेव चौगुले,सचिन कांबळे स्वीय सहाय्यक विशाल खंदारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे शुभारंभ सोलापूरचे खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,खा.रणजितसिंह नाईक निबांळकर,खासदार धनजंय महाडिक यांच्या हस्ते आणि माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थित होणार आहे.यांच कार्यक्रमात मंगळवेढ्याच्या मा.नगरध्याक्षा अरुणा माळी व पोलिस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्या हस्ते 41 महाराजांचा सत्कार करण्यात येणार आहे. ब्रम्हचितकलेचा साक्षात्कार घाडवणारा किर्तन सोहळा अमोघ वाणाचे विलक्षण सामर्थ्य लाभलेले युवा किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांच्या किर्तनाचा संतभुमीतील सर्व वारकरी, किर्तनकार तसेच भजनी मंडळीने त्याच्या वाणीची शिदोरी घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महात्मा फुले सुतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे,शाहु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे,विश्वस्त क्रांती आवळे,अॕड.कोमल ढोबळे,अजय सांळुखे यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close