मंगळवेढ्याच्या जडणघडणीत शहा कुटुंबाच्या तिन्ही पिढीचा वाटा-प्रशांत परिचारक

युवक नेते प्रतिक किल्लेदार यांचे नागरी सत्कार सोहाळ्याचे नेटके नियोजनाचे कौतुक!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढ्याच्या जडणघडणीत शहा कुटुंबाच्या तिन्ही पिढीचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार मा.आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात नागरी सत्कार सोहाळा व विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण, रतनचंद शहा बॅकेच्या क्युआर कोड,व भारत बिल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिपक साळुंके-पाटील हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे,दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील,जेष्ठ नेते बबनराव आवताडे,जकाराया शुगरचे बिराप्पा जाधव,उमेश पाटील,लतीफ तांबोळी,रामचंद्र वाकडे,व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप,मातोश्री सुभदा शहा,योशादा पतसंस्थेच्या अध्यक्षा निला आटकळे,मा नगराध्याक्षा अरूणा माळी,आश्विनी शहा, दामाजीचे संचालक पी.बी.पाटील,प्राचार्य एन.बी.पवार मा.नगरसेवक अरूण किल्लेदार,मुझ्झफर काझी,रामकृष्ण नागणे,रामेश्वर मासाळ,बजरंग ताड राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,शिवसेनेचे शहरध्यक्ष प्रतिक किल्लेदार आदी उपस्थित होते.   यावेळी बोलताना माजी आमदार परिचारक म्हणाले की तुम्ही जेवढे एकत्र आले असाल तेवढे आम्ही दोघे एकत्र आलो.त्यांची आणि आमची दुःखे सारखे आहेत पण राजकारणाचे नव्हे तर बॅकेची, राहुल शहा हे मनस्वी वेगळ्या स्वभावाचे आहेत,वाढवडिलानी सुरू केली संस्था जबाबदारी चालवावी या धोरणेने ते काम करीत आहेत. बँक चालवणे व इतरांना मदत करणे पूर्वी आनंद वाटायचे,सध्या कर्ज घेणारा निवांत झोपलेला असतो मात्र देणारा जागो असतो. आरबीआयच्या नियमानुसार कर्जाची वसुली वेळेत झाली नाही तर निर्बंध लादले जातात आणि या निर्बंधाला पूर्वी मॅनेजरला सामोरे जावे लागत होते पण आता चेअरमनलाही त्याला सामोरे जावे लागत आहे बँकेचा चेअरमन म्हणजे एक काटेरी मुकुट आहे.राहुल शहा ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले की शेडजीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत बँकेच्या आधाराने मोठे झालो त्यांनी बँकेच्या अडचणीच्या काळात सावली म्हणून उभे राहण्याची गरज आहे. बळीराम साठे म्हणाले की, तीन पिड्यांची परंपरा असलेल्या शहा कुटुंबांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. दीपक साळुंखे पाटील, मंगळवेढा शहराचा विकास लिहीत असताना शहा व मारवाडी वकील या दोन नावा शिवाय इतिहास पूर्ण होत नाही. बँकेची जबाबदारी राहुल शहा यांच्याकडे पडल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी नेटाने सांभाळली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहुल शहा यांचा सपत्नीक मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रशेखर कौडूभैरी यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे आणि विनायक कलुबर्मे तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.