मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य; दामाजी चौकात फटाके फोडून गुलालाची उधळण करत मंगळवेढ्यात जल्लोष!

मंगळवेढा(प्रतिनिधी) सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे मंगळवेढ्यातील दामाजी चौकात फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आले.

          सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र सत्तेवर येताच आरक्षणाच्या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे या समाजाला अखेर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी मागणी सुरुवात केल्यापासून अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलीस लाठीहल्यानंतर मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन, मुंडन आंदोलन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, एसटी वरील एसटी बस वरील सरकारी  जाहिरातीवरील राजकीय नेत्यांना काळे फसणे या वेगवेगळ्या माध्यमातून मंगळवेढ्यात आंदोलन करत सरकारला आपल्या भावनांची तीव्रता दाखवण्यात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधव यशस्वी ठरले होते. आंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यान आंदोलनामध्ये मंगळवेढा तालुक्यातील हजारो बांधव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्गस्थ झाले ,मरवडे,आंधळगाव,मारापूर,भोसे येथील बांधव सहभागी झाले होते,आज पहाटेच्या दरम्यान या मागण्या मान्य झाल्यामुळे आज सकाळी दामाजी चौकात फटाके फोडण्यात आले व मराठा बांधवांनी गुलाल उधळला व शहरातून हलग्याच्या आवाजात मिरवणूक काढत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये भाळवणी, आंधळगाव, डोंगरगाव, मरवडे, बोराळे, मारापुर, ब्रह्मपुरी,सलगर,खोमनाळ, या ठिकाणी देखील फटाके उडवण्यात आले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.