
मंगळवेढा(प्रतिनिधी )भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस चे खासदार राहुल गांधी याच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध करण्यात आला. खा.राहुल गांधी ची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे . सध्या ही यात्रा महाराष्ट्रात असून या यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे. याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राहुल गांधी व काँग्रेस चा निषेध करण्यात येत आहे . मंगळवेढा शहरामध्ये राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तसेच गाढवाच्या गळ्यामध्ये राहुल गांधींचा फोटो अडकवून निषेध करण्यात आलेला आहे . यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगत भाजप कधीही सावरकरांचा अपमान सहन करू शकणार नाही,जेव्हा असे वक्तव्य एखाद्या क्रांतिकारक बद्दल कोणीही बोलेल तेव्हा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया दिली .
युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सुदर्शन यादव यांनी ही राहुल गांधी यांच्यावर टीका करत ही भारत जोडो यात्रा नसून पुन्हा एकदा भारत तोडो यात्रा असल्याचे म्हणले ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्यांना आज अपमानकारक बोलून अश्या क्रांतिकारकांचा अपमान करून राहुल गांधी कोणती भारत जोडो यात्रा करत आहेत अशी टीका त्यांनी केली .
मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद , सावरकर जी के सन्मान मे भाजपा मैदान मे , स्वातंत्र्यवीर सवरकरांचा विजय असो,अश्या घोषणा देत राहुल गांधी यांच्या पोस्टर ला जोडे मारण्यात आले .
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शहराध्यक्ष गोपाळ भगरे ,जिल्हा सचिव संतोष मोगले,माजी भाजपा तालुकाध्यक्ष अशोक माळी,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुनील रत्नपारखी,किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय बुरकुल,उपाध्यक्ष नागेश डोंगरे,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सुदर्शन यादव,शहरध्यक्ष सुशांत हजारे , सरचिटणीस अजित लेंडवे,अल्पसंख्याक सेल चे झाकीर तांबोळी,कपिल हजारे,संजय माळी,शिवा कोष्टी,शुभम जाधव,शिवशंकर तटपटे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते .