मंगळवेढा(प्रतिनिधी)धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. हे खऱ्या अर्थाने धनश्री परिवारातील आर्थिक संस्थेचे मोठे यश असल्याचे प्रतिपादन आ. समाधान आवताडे यांनी केले.
सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, धनश्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शोभाताई काळुंगे, संग्राम कचरे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, डॉ. पद्माकर अहिरे, दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, डॉ. भाऊसाहेब जानकर, विष्णुपंत आवताडे, डॉ. शिवाजीराव पवार, डॉ. भीमाशंकर बिराजदार, युवराज गडदे, बाबूराव शिंदे, बबन सरवळे, ईश्वर गडदे, रामचंद्र बंडगर, अविनाश चव्हाण, सीमा काळुंगे, सुयोग गायकवाड, पप्पू काकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले, मोठया विश्वासाने प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांनी आज धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातुन 1500 कोटीच्या ठेवी जमा केल्या. ही मंगळवेढेकारासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आर्थिक क्षेत्रात काम करताना संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची क्षमता शिवाजीराव काळुंगे यांच्यामध्ये आहे. तसेच आर्थिक चळवळीला शिस्त लावण्याचे काम शोभाताई काळुंगे यांनी केले आहे.
प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री व सिताराम परिवाराने वाटचाल सुरू ठेवली आहे. एकीकडे देशाला आदर्श असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आज ग्रामीण विकासापासून ते राष्ट्रीय विकासापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार आहे. प्रास्ताविक डॉ राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी तर आभार ज्ञानदेव जावीर यांनी केले.
——
आरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, हृदयरोग तपासणी, औषधे वितरण, चष्यांचे वितरण, इसीजी तपासणी, रक्तगट तपासणी, रक्तक्षय तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण सुविधा या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.