मंगळवेढा(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार यांचा सोलापूरहून सांगोल्याकडे कार्यक्रमाला निघाले असता अभिजीत पाटील यांच्या विनंतीला मान देऊन मंगळवेढा शहरांमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोटार सायकल रॅली काढून क्रेनद्वारे भला मोठा हार तसेच वारकरी संप्रदायाची पगडी, विना व चिपळ्या देऊन शरद पवार यांचे स्वागत केले.
मंगळवेढा तालुक्याला विकासाला गती द्यायची असेल तर अभिजीत पाटील यांच्या मागे शक्ती उभी करून ठामपणे उभे रहा असे शरद पवार यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यापूर्वीच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन वेळी शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना आपल्या गटामध्ये घेत येत्या महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण असेल तर अभिजीत पाटील असतील असे शरद पवार यांनी मोठे विधान केले होते त्याच विधानाला साक्षी ठेवून अभिजीत पाटील यांनी गावोगावी खेडोपाडी तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात, लग्न समारंभात तसेच अनेक कार्यकर्त्यांचे वाढदिवस करत राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठी फळी उभा केलेली आज दिसून आलेले आहे.
संत दामाजी पंताना अभिवादन करून शरद पवार यांनी जुन्या आठवणी रतनचंद शहा घराण्यातील सांगितल्या. तसेच कायम राष्ट्रवादी पक्षासोबत असणारे राहुल शहा यांच्या घरी जेवणाची व्यवस्था झाल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांना भेटून शरद पवार हे सांगोल्याकडे रवाना झालेले दिसून आले. तरी देखील अभिजीत पाटील हे सोलापूरहून मंगळवेढा तसेच मंगळवेढा इथून सांगोल्याकडे रवाना झालेले दिसून आले व सांगोल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर देखील अभिजीत पाटील बारामतीच्या दिशेने शरद पवारांच्याच गाडीत दिसून आले. नेमका अभिजीत पाटलांना काय कानमंत्र दिला याची कुजबुज पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात होताना दिसत आहे.
राजकारणात धुरंदर मानले जाणारे शरद पवार यांना अवघ्या महाराष्ट्रातील अनेक आमदारांसह,पक्ष फुटी होताना दिसून आली तरी देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये नवखे असणारे अभिजीत पाटील हे एकमेव पवार साहेबांच्या सोबत राहून पक्ष वाढीसाठी झटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे संतभूमी असलेल्या मंगळवेढा येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. संत दामाजीपंत यांना अभिवादन करून विना, पगडी, चिपळ्या वारकरी शेला घालून साहेबांचा सत्कार करण्यात आला..
आपल्या मंगळवेढा परिसराचे भवितव्य बदलणे हे तुमच्या आमच्या हातात आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे, पक्ष सांगतो त्या व्यक्तीच्या मागे मोठी शक्ती आपण सर्वांनी उभी केली पाहिजे. जेणेकरून येत्या काळात सर्वांगीण विकास होऊन सर्वत्र सुबत्ता आणि सुख-समृद्धी येऊ शकेल.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.