मंगळवेढा (प्रतिनिधी)ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठीच शिक्षण प्रसार हे ब्रीद मनाशी ठेवून
स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा
संस्थेची पायाभरणी केली. पुढे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी संस्थेला बळकटी आणली. सध्या शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष अॕड.सुजीत कदम यांनी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय सुरू केले तसेच आता वैद्यकीय क्षेत्रातही एक पाऊल टाकत बी व डी फार्मसी काॅलेजला मान्यता मिळवली आहे. येणाऱ्या काळात मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. मंगळवेढा शहरातच शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध होतील अशी प्रतिक्रिया शि.प्र.मंगळाचे अध्यक्ष अॅड सुजीत कदम यांनी सांगितले.
डी फार्मसी म्हणजे बारावी नंतर दोन वर्षाचा हा कोर्स आहे. डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मसी केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मेडिकल काढता येते किंवा एखाद्या कंपनीमध्ये फार्मसिस्ट म्हणून काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्याना फार्मसी क्षेत्रात करियर करायची इच्छा आहे.त्यांच्या साठी डी फार्मसी हा एक उत्तम पर्याय आहे.तसेच
बी फार्मसी हा कोर्सचा कालावधी ४ वर्षाचा असतो. आणि त्यांना हा ४ वर्ष कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर सुद्धा काढता येतो व एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीत काम करता येते. वेगवेगळ्या तऱ्हेचे आजारांवर औषध निर्माण करणे व त्याच्यावर चाचणी करणे हे त्यांचे कार्य असते.मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. बदलत्या मानवी जीवन शैली मध्ये मनुष्याला विविध आजार होता आहेत. यामुळे औषध निर्मिती व संशोधण करणे काळाची गरज बनत आहे. डी फार्मसी उत्तीर्ण झाल्या नंतर विद्यार्थी विविध फारमासुटिकल कंपनीनं मध्ये नोकरी मिळवतात. त्याबरोबरच बी फार्मसी , एम फार्मसी. शिक्षण घेऊ शकतात.
बी आणि डी फार्मसी साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याना सामान्य पणे कोणतीही प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नसते.बी व डी फार्मसी साठी विद्यार्थ्याना बारावी च्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे.विद्यार्थानी आपली प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही.आमच्या संस्थेची अमृतमहोत्सवी वाटचाल सुरू आहे.आजपर्यंत अनेक उच्चपदस्थ विद्यार्थ्यांनी प्रशालेतून शिक्षण घेतले. शिक्षणाची गुणवत्ता टिकवून आहोत. येणार्या काळात विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध करून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करू.
-अॕड सुजीत कदम
अध्यक्ष ,शिक्षण प्रसारक मंडळ,मंगळवेढा