राजकियसामाजिक

आवताडे शुगर्स येथे शेतकरी मेळाव्यासाठी आ.समाधान आवताडे यांची जंगी तयारी!

शेतकरी मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधीत करणार!

मंगळवेढा(प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवताडे शुगर अॅन्ड डिस्टलरीज प्रा. लि.या खाजगी कारखान्याच्या पहिल्याच गाळप हंगामाच्या सभास्थळाची आ. समाधान आवताडे यांनी पाहणी करून गाळप हंगामाच्या शुभारंभ बरोबर शेतकरी मेळाव्यासाठी जंगी तयारीचे नियोजन सुरू केले आहे. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून आ.समाधान आवताडे यांना आमदारपदाची संधी मिळाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात होते त्यामुळे भाजपाचे 105 आमदार विरोधी बाकावर असल्याने त्यात आणखीन एका आमदाराची भर पडली अशा प्रकारचे खिल्ली राजकीय वर्तुळामध्ये उडवण्यात आली होती परंतु राज्यात नाट्यमय रीत्या झालेल्या सत्ता बदलामुळे आ. आवताडे यांना सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान त्यांनी तालुक्यातील पाणी व रस्ते प्रश्नाला निधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घेतला नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शविली असली तरी ते उद्याच्या शेतकरी मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता या भागातील नागरिकांना लागली आहे याशिवाय आ.अवताडे यांनी पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्ग,पंढरपूर औद्योगिक वसाहत, तसेच बसवेश्वर,चोखोबा स्मारकासह अनेक प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश प्रश्नाला हिरवा कंदील मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी बंधु संजय आवताडे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने घेतलेल्या अवताडे शुगर अॅन्ड डिस्टलरीज प्रा. लि. या खाजगी कारखानदारीच्या माध्यमातून पहिल्याच गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने थेट उपमुख्यमंत्र्याला विठ्ठल पुजेनंतर मंगळवेढा येथे पाचरण केले त्याचबरोबर पालकमंत्री व इतर जिल्ह्यातील भाजप आमदारांनाही या कार्यक्रमाला निमंत्रित केले त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून आ अवताडे हे देखील मोठे शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत असून त्या दृष्टीने त्यांनी स्वतः सभास्थळाची पाहणी करत सभेचे नियोजन केले.      यावेळी सभास्थाळाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,सपोनि अमोल बामणे,आदीनी जागेची पाहणी केली. यावेळी पोलिस प्रशासनास सभेच्या नेटक्या नियोजनाची माहिती ज्ञानेश्वर बळवंतराव यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close