मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवर्षी साहेब यांचे अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. मुख्य न्यायाधीश देवर्षी साहेब उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाल कि, प्रत्येक नागरिकाला कायद्याने अधिकार असतो.झोपलेल्या व्यक्तीला कायदा कधीच मदत करीत नसतो तर जे सतर्क असतात अशांना कायदा मदत करीत असतो.कामगारांसाठी अनेक कायदे आहेत परंतु त्याचे ज्ञान कामगारांना असणे महत्वाचे आहे.त्यासाठी अशा शिबीरांचे आयोजन करुन कामगारांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. कामगार कामावर असताना अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंंबियांना उदरनिर्वाहासाठी संस्थेकडून नुकसान भरपाई मिळविता येते.विधी सेवा प्राधिकरणाकडून दुर्बल घटकांना ज्यांचे उत्पन्न तिन लाखाच्या आतमध्ये आहे अशांना मोफत कायदेशिर सल्ला, वकीलाची मोफत नेमणूक करुन न्याय दिला जातो.
वकील संघाचे उपाध्यक्ष अॕड लवटे म्हणाले, कामगार म्हणजे संस्थेचे हात असता. हे हात व्यवस्थीत चालले तर संस्था व्यवस्थीत चालते. कामगारांनी कामावर गर्व न करता संस्था चांगली कशी चालेल हे पाहिले पाहिजे. कामगारांना असणारे हक्क हे कामगार विषयक कायद्यात नमूद आहेत. याचे ज्ञान कामगारांनी करुन घ्यावे.बालकामगार प्रतिबंधात्मक कायदयानुसार १८ वर्षाखालील कामगारांना कामावर ठेवता येत नाही. याचे पालन संस्थेने करणे गरजेचे असते. यांत्रीक कामगार,आॕफिस कामगार,वाहतूक करणारे कामगार अशी कामगारांची वर्गवारी असलेचे त्यांनी सांगीतले.
या मार्गदर्शन शिबीरप्रसंगी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक सर्वश्री भारत बेदरे,बसवराज पाटील,रेवणसिध्द लिगाडे,दयानंद सोनगे,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे,तानाजी कांबळे, दादासाहेब दोलतडे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी सरकारी वकील श्री बनसोडे, मंगळवेढा वकील असोसिएशनचे उपाध्यक्ष अॕड.सुजय लवटे,अॕड.बामणे,अॕड. गायकवाड,अॕड.शिरिष पवार,अॕड रविकिरण कोळेकर,अॕड.दुधाळ,अॕड.मनिष मर्दा,अॕड.मोरे, अॕड.ओंकार भुसे तसेच कारखान्याचे चिप.इंजिनिअर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट मेश जायभाय, चिफअकौंटंट रमेश गणेशकर, मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, पर्चेस आॕफिसर येताळा सावंजी, स्टोअरकिपर उत्तम भुसे, ई.डी.पी.मॕनेजर मनोज चेळेकर, गोडावूनकिपर विश्वास पवार,लेबर आॕफिसर आप्पासोा शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील,सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, सर्व विभागप्रमुख, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते।
या शिबीराचे समारोपाप्रसंगी उपस्थितांचे आभार संचालक रेवणसिध्द लिगाडे यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले।
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.