मंगळवेढा (प्रतिनिधी) सांगोला येथील सुप्रसिद्ध श्रीमंत मेन्स वेअर या कपड्याच्या भव्य दालनाच्या शाखा क्रमांक तीन चे मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव जि प सदस्य अतुल पवार युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले सजग अध्यक्ष संजय कट्टे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद केदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सांगोला आटपाडी नंतर मंगळवेढा मध्ये तरुणाई मध्ये क्रेझ असलेले श्रीमंत मेन्स वेअर दुर्गामाता नगर येथील एचडीएफसी बँकेच्या खाली असलेल्या भव्य स्टुडिओ निर्मित असलेले हे दालन रविवारी सकाळी अकरा वाजता मंगळवेढेकरांच्या सेवेत सुरू झाले युवकांच्या आवडीचे शर्टस जीन्स अरमानी फॉर्मल पॅन्टस खादी लिनन सॅटीन कॉटन सिल्क शर्ट्स ,पॉपकॉर्न पॅन्टस, जर्किंगज, जॅकेट्स, अंकेल ,जीन्स, ट्रँडींग शर्टस, ट्रॅक पॅंटस, टी शर्टस शूज, परफ्युम, ब्रँडेड घड्याळे, बेल्ट ,वोलेट, कडा, गॉगल्स, टिशर्टस च्या असंख्य व्हरायटी याठिकाणी उपलब्ध आहेत.
अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे शर्ट पॅन्ट अत्यंत माफक दरामध्ये ब्रॅण्डेड कपड्यांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट सध्या सुरू असल्याने तरुणाईचा कल श्रीमंत मेन्स वेअर मध्ये खरेदीसाठी वाढला असल्याचे संचालक धीरज पवार आदेश फडतरे स्वप्नील पाटील यांनी सांगितले
या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी माजी सभापती प्रदीप खांडेकर, पक्षनेते अजित जगताप, मृदू व जलसंधारण लेखाधिकारी अजित शिंदे, इंद्रजित घुले,सचिन नागणे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू पत्रकार हुकुम मुलाणी, महादेव धोत्रे, प्रा विक्रम पवार,चेअरमन नामदेव चौगुले,सह राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते