मंगळवेढा (प्रतिनिधी) परिचारक मालक यांच्या सहकार्याने दामाजीचा कारभार सभासदांच्या विश्वासहारतेने चालू आहे. कोणाचेही देणे बाकी नाही, संस्था टिकाव्यात यासाठी मालकांचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. मालकांच्या प्रयत्नातून दामाजी कारखान्याला 94 कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत. दामाजी कारखान्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली असे चेअरमन शिवानंद पाटील व्यक्त केले.
मारोळी तालुका मंगळवेढा येथील संत गाडगेबाबा महाराज मठ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा बैठक पार पडली,याप्रसंगी कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
पुढे बोलताना शिवानंद पाटील बोलताना म्हणाले, आपले नेते प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजी कारखाना चांगला चालवीण्याचा प्रयत्न केला,एकत्रित बसून दामाजी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मालकांनी सूचना केल्या होत्या. मात्र आमच्या संचालक मंडळाची लायकी काढण्यात आली होती.
तालुक्यात पाणी आणण्याचा गाजावाजा करून डंका वाजविला जातोय, हे पाणी कागदावरच राहणार..प्रत्यक्षात पाणी आल्यानंतर किती शेतकऱ्यांना या योजनेतून पाणी मिळणार याचा विचार होणे गरजेचे आहे.
हक्काचे दोन टीएमसी पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळणार होते. त्याकडे दुर्लक्ष झाले, गुंजेगाव बंधाऱ्यावरती बॅरेज उभारले असते, तर पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असता,
2024 साठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने मंगळवेढा तालुक्यात एक नंबर ला मालकांना मताधिक्य देऊन विजयी करूयात असे मत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले,आम्ही शब्द पाळणारे आहोत.खरं बोलण्यापेक्षा बरं बोलणारे जास्त आहेत. त्यांचे राजकारणत चालते.बरं बोलणे एक वेळ, दोन वेळ चालेल, मात्र तिसऱ्या वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावं लागतं. पक्षाशी गद्दारी करणे आमच्या रक्तात नाही, जो ही निर्णय घेऊ ठामपणे सांगून, बोलून घेऊ. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.
गेल्या 30 ते 35 वर्षापासून आमदारकी आमच्याकडे होती.आम्ही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करीत असतो, ज्या अपेक्षांनी गेल्या पोट निवडणुकीत पक्षाचा आदेश मानून 80 हजार मते आपणाकडे असतानाही 40 हजार मते घेणाऱ्या उमेदवाराला मदत केल्याने आमदार झाले. मी काय ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, उद्योगपती नाही,परिचारक गटाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या सहकार्यामुळे आमदार झाले, विकासाच्या अनेक गप्पागोष्टी आज मारल्या जात आहेत.कोट्यावधीचा निधी आणला म्हणून गाजावाजा केला जातोय तर आमदाराला साड्या वाटण्याची वेळ कशी आली..असा सवाल परिचारक यांनी उपस्थित केला.
यावेळी दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर,माजी संचालक कांतीलाल ताटे, इनुसभाई शेख,तानाजी पवार, सुनील थोरबोले, राजू पाटील, रणजीत जगताप, बिराप्पा करे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी उपसभापती काशिनाथ पाटील,माजी जि प सदस्य नामदेव जानकर, शिवाजीराव नागणे, गौरीशंकर गुरुकुल, महादेव लुगडे, अशोक माळी,कुमार स्वामी, संजय पाटील,दत्तात्रय भाकरे, धनंजय व्यवहारे, श्रीकांत गणपाटील, सरपंच संजय पाटील, सचिन चौगुले, अशोक माळी, राजकुमार पाटील, गोविंद भोरकडे, संजय बिराजदार,रामभाऊ माळी, शिवाजी वाघमोडे, सिद्धेश्वर मेटकरी, आप्पासाहेब पाटील, भागवत भुसे,माधवानंद आकळे, हरिदास हिप्परकर, संतोष सलगर, नागेश कनशेट्टी यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक औदुंबर वाडदेकर तर आभार लवंगी गावचे माजी सरपंच तानाजी पवार यांनी मानले.