पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसोलापूर

मुख्यमंत्री शिंदे बहिणींच्या घरी जाणार! ‘लाडकी बहिण कुटुंब भेट अभियाना’ला सुरुवात

मुबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या घरी जाणार आहेत. सोमवारी यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाद्वारे घरोघरी शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती देण्यात येईल. मंगळवारपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः १५ कुटुंबांची भेट घेऊन या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. या अभियानात शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, सचिव, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी सहभागी होणार असून प्रत्येक शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की, नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close