मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी आलेल्या पुराने तामदर्डी व रहाटेवाडी या दोन गावाला दळणवळण करणे अडचणीचे ठरत असल्याने रखडलेल्या फुलाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सदर पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा या संदर्भात तामदर्डी येथील ग्रामस्थानी मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली असता त्या भेटीत ही मागणी केली त्यानंतर लगेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहीत सदर दोन गावाला जोडणाऱ्या पुलाचा प्रश्न महत्वाचा असून पावसाळ्यात भीमा नदी पात्रात पाणी आल्यानंतर दोन गावाशी संपर्क देखील तुटतो त्यावेळी ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होत असल्याने फुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी या निवेदनात मदत केली