आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणेबाबत आ.समाधान आवताडे यांना सकल मराठा समाजाचे निवेदन!
मंगळवेढा(प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवणेबाबत आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात आले.
मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवरती आरोप – प्रत्यारोप करून टोलवाटोलवी करत आहेत. प्रसारमाध्यमावरती चर्चा करण्यापेक्षा विधानसभेत चर्चा घडवावी. मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजास ओबीसीमधून व ५० टक्केच्या आतून आरक्षण देणेबाबत महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे.
त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत प्रस्ताव ठेवावा आणि त्याच्यावर सर्वपक्षीय सर्व आमदारांची चर्चा घडवून प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका मांडावी व त्याचा एकमुखी ठराव करण्यात यावा आणि या सर्व कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांकडे करावी, यासाठी सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्यावतीने निवेदन देण्यात आले