
मंगळवेढा(प्रतिनिधि)सध्या राज्यात विधानसभेच्या तयारीचे राजकीय वारे वाहत असतानाच याच धामधुमीत राजकीय श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात 2500 घरगुती गणपतीचे वाटप करून राजकीय श्रीगणेशा केला.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सध्या अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होऊ लागले आहेत. इच्छुकांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना त्यातून आपली राजकीय मोर्चे बांधणी करत असताना त्या त्या उमेदवाराला राजकीय राजश्रय असणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघात सध्या भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे दावेदार मानले जात आहेत त्याचबरोबर सर्वाधिक इच्छुक हे तुतारीकडून असून त्यामध्ये भगीरथ भालके, भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, पंढरपूर येथील सुभाष भोसले, नागेश भोसले, वसंत देशमुख मंगळवेढा येथून राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील हे इच्छुक आहेत मात्र विधानसभा निवडणुकीचा आखाडा अद्याप जाहीर झाला तरी राजकीय आखाड्याचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने उद्यापासून सुरू होणाऱ्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी मतदारसंघातील गणेशभक्त तयारीत असतानाच भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मतदारसंघातून 2500 गणेश मूर्तीचे वितरण करून आपला राजकीय श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न केला.अनिल सावंत हे विद्यमान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून ते यास मतदारसंघातून आमदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. लवंगी कारखान्यामुळे तालुक्यात ऊस गाळपाबरोबर बेरोजगारांना हाताला काम केल्यामुळे निवडणुकीसाठी त्यांनी यापूर्वी भोसे जिल्हा परिषद गटातून आपला राजकीय गट मजबूत करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबवले. आता विधानसभेत जाण्याचे मनसुबे असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात गणेश मूर्तीचे वितरण करून श्री गणेशा केला असला तरी शिवसेनेचा धनुष्यबाण की तुतारी याचा श्री गणेशा कधी करणार याची चर्चा मात्र या निमित्ताने मतदारसंघात सुरू झाली आहे