कोरोनाच्या लसी विकत टोचल्या;तरीही आम्ही थॅक्कू मोदीजी का म्हणायचे-निरंजन टकले
मंगळवेढा(प्रतिनिधी) देशातील सुदृढ नागरिकांसाठी ज्या काॅग्रेस सरकारने मोफत लसी दिल्या,मात्र या सरकारने कोरोनाच्या लसी विकत टोचल्या.तरीही आम्ही थॅक्कू मोदीजी का म्हणायचे,त्यासाठी अब की बार चारसौ पार करण्याऐवजी अब कि बार तडीपार करण्याचे आवाहन पत्रकार निरंजन टकले यांनी केले.
काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही की हुकूमशाही या विषयावर संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे,सिध्दाराम म्हेत्रे,कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार,धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे,विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,चेतन नरोटे,प्रकाश पाटील,मनोज यलगुलवार,मुझमील काझी,पांडुरंग चौगुले,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,राजाभाऊ चेळेकर,विनोद भोसले,सुशील बंदपट्टे,मनोज माळी,अॅड रविकिरण कोळेकर,पांडुरंग जावळे,अजय अदाटे आदीसह काॅग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार टकले म्हणाले की, जी व्यक्ती आई व पत्नीला गॅरटी देवू शकले नाहीत तेच आपणाला गॅरटी देवू लागली. दहा वर्षात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या त्या घटनेत यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे कशी येतात.पैसे बुडविणा-याला राम मंदीराच्या उद्घाटनाला बोलावले मात्र देशाच्या प्रथम नागरिकाला बोलावले नाही.आणि त्यांच्याकडून नारी शक्तीचा सन्मान शिकवला जात आहे,देशावर केलेल्या दोनसे लाख कोटी कर्जाचा हिशोब आदी मागण्याचे आवाहन उपस्थितांना केले..प्रत्येक बुथवर आघाडी घेण्याचे सांगत हे शक्य केल्यास इंडीया आघाडीचे सरकार येईल. माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की,मी इथला लोकप्रतिनिधी असताना विदर्भ अनुशेष ची अट रद्द करून मंगळवेढा उपसा योजना मंजूर केले.दोन वेळा चुक झाली आता तिसरी चूक करू नका. विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की,सध्या हुकूम शहाच्या विरोधात देश एकत्र येत आहेत. सर्व आघाडी नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची न सापडणारी फाईल स्व.भारत,भालके च्या प्रयत्नाने सापडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अजितदादाच्या प्रयत्नाने यापुर्वीच मंजूर केली.पाणी कुणाच्याही दंडाने येवू पण पाणी येवू द्या. प्रस्ताविकात तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नाला फक्त काँग्रेस न्याय देऊ शकते आ. प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यापासून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती आली ग्रामीण भागाभागातील दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांच्या अनेक समस्या जाणून घेतल्यामुळे रखडलेल्या प्रश्नाला न्याय देऊ शकेल अशी भावना निर्माण झाली.