पंढरपूरमंगळवेढाराजकियसामाजिक

स्व.अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कारांने प्रा.शिवाजीराव काळूगे सन्मानित

वाळवा येथे स्व अरूणभैया नाईकवाडी स्मृती पुरस्काराचे वितरण

मंगळवेढा(प्रतिनिधी) वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय स्व. अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार यंदा धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना 25 हजार रोख, सन्मान चिन्ह, मानपत्र देवून वाळवा येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

 स्व. अरुणभैय्या नायकवडी यांच्या 19  व्या स्मृती दिनी 24 फेब्रुवारी रोजी हुतात्मा शिक्षण संकुलात हा पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी हुतात्माचे अध्यक्ष  वैभवकाका नाईकवाडी, हुतात्मा डेअरी चे अध्यक्ष गौरव नायकवडी, युवानेते वीरधवल नाईकवाडी, धनश्रीच्या अध्यक्षा प्रा, शोभाताई काळूगे, बाबुराव गुरव, हुतात्मा चे कार्यकारी संचालक समीर सलगर, दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील, दयानंद सोनगे, ज्ञानदेव जावीर, दत्तात्रय पाटील, यादापा माळी, युवराज गडदे, रमेश भांजे, विनोद पाटील, सुनील पाटील, रावसाहेब पाटील, प्रभाकर कलुबरमे, प्रकाश काळुंगे, विलास सरवळे, अड. भारत पवार, इंद्रजित घुले,

दिलीप कलुबर्मे, बाळासाहेब यादव, आदी उपस्थित होते.यावेळी  हुतात्मा चे चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले, प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या बरोबरीने पाणी संघर्ष चळवळीत काम करताना गोरगरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातून केलेले काम कौतुकास्पद आहे.तसेच सीताराम कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी व शेतमजूर कष्टकऱ्यांना त्याची देयके वेळेत बिले अदा करून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रा काळुंगे यांना हा पुरस्कार देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.यावेळी बोलताना प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, स्व. नागनाथ आण्णांच्या प्रेरनेने कोणताही स्वार्थ न ठेवता तन मन धनाने काम केले. हुतात्मा समूहाने पुरस्कार देवून कौतुकाची थाप पाठीवर दिल्याने अजून समाजासाठी लढण्याचे बळ आले आहे. आमच्या घडण्यामध्ये अण्णांचे योगदान मोठे असून त्यांच्या विचारांवर आम्ही सामाजिक, आर्थिक, पाणी चळवळीत काम करत असल्याचे त्यानी सांगितले.पुरस्काराच्या रकमेइतकी रक्कम स्वतःच्या खिशातून देत गोरगरिबाच्या शैक्षणिक मदतीसाठी देण्याचे जाहीर केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close