मंगळवेढा(प्रतिनिधी) सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे मंगळवेढ्यातील दामाजी चौकात फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आले.
सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र सत्तेवर येताच आरक्षणाच्या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे या समाजाला अखेर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी मागणी सुरुवात केल्यापासून अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलीस लाठीहल्यानंतर मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन, मुंडन आंदोलन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, एसटी वरील एसटी बस वरील सरकारी जाहिरातीवरील राजकीय नेत्यांना काळे फसणे या वेगवेगळ्या माध्यमातून मंगळवेढ्यात आंदोलन करत सरकारला आपल्या भावनांची तीव्रता दाखवण्यात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधव यशस्वी ठरले होते. आंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यान आंदोलनामध्ये मंगळवेढा तालुक्यातील हजारो बांधव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्गस्थ झाले ,मरवडे,आंधळगाव,मारापूर,भोसे येथील बांधव सहभागी झाले होते,आज पहाटेच्या दरम्यान या मागण्या मान्य झाल्यामुळे आज सकाळी दामाजी चौकात फटाके फोडण्यात आले व मराठा बांधवांनी गुलाल उधळला व शहरातून हलग्याच्या आवाजात मिरवणूक काढत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये भाळवणी, आंधळगाव, डोंगरगाव, मरवडे, बोराळे, मारापुर, ब्रह्मपुरी,सलगर,खोमनाळ, या ठिकाणी देखील फटाके उडवण्यात आले.