मंगळवेढ्यात जल्लोष मराठी कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने
मंगळवेढा (प्रतिनिधी): शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनानिमित्त अ.भा. मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढाच्या वतीने इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर संपन्न झालेल्या जल्लोष मराठी या मराठी लावणी सदाबहार गाणी, विनोद व नृत्याच्या जल्लोषाने उपस्थित असलेल्या रसिकांची मने जिंकली.
सुरुवातीस नटराजपूजन करून द.मि.कदम गुरुजी यांच्या प्रतिमेस मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डॉ. श्रीराम लागू रंगमंचाचे पूजन माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजीराव पवार, मसापचे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सचिव प्रियदर्शनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, नियामक मंडळाच्या सदस्या प्रा. तेजस्विनी कदम, डॉ. मिनाक्षी कदम, मनीषा महाडिक , व अ.भा. मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढाचे सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध शाळांचे मुख्याध्यापक, म शिक्षक शिक्षिका, कर्मचारी व व नाटयप्रेमी तसेच अनेक महिला म उपस्थित होत्या.
माजी सदस्य यतिराज वाकळे, मसाप सोलापूरचे प्रमुख कार्यवाह गिरीष दुनाखे, कामगार कल्याण केंद्र संचालक नागेश कवडे, नाटय परिषदेचे उपाध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, कार्यवाह अशपाक काझी, शिवार नाटय संमेलनाचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे, डॉ. शरद शिर्के, डॉ. प्रिती शिर्के, प्रा. उज्वला पाटील, अजित शिंदे, राजेंद्रकुमार जाधव, राकेश गायकवाड, सुहास माने, युवराज जगताप, सचिन ढगे, सतीश सावंत, धनंजय पाटील, रामचंद्र दत्तू, राजेंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, अँड. संभाजी घुले, इंद्रजित घुले, मालिकामधील कलाकार, अभिनेत्री धनश्री काडगावकर, मृण्मयी गोंधळेकर, चला हवा येवू दया फेम अंकुर वाडवे, स्नेहल शिदम, गायक अनिल प धुरी, अजित वीसपुते, सुजित सोमण या कलावंतांनी आपल्या व सादरीकरणाव्दारे धमाल उडवून टाळ्यांचा प्रतिसाद मिळविला. कार्यक्रमाचे निवेदन निर्माता व स्वप्नील रास्ते यांनी केले. तर बालाजी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.