मंगळवेढा(प्रतिनिधी) चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दुष्काळी भागात अनेक शैक्षणिक सुविधा दिल्या. त्याचा विद्यार्थ्यांनी शिकत क्रिडा स्पर्धेतून खेळाचा फायदा घ्यावा असे आवाहन बॅक ऑफ इंडिया भोसे शाखेचे व्यवस्थापक सागर होनमुटे यांनी व्यक्त केले.
हुन्नूर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आंतरशालेय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रशांत साळे,सचिव पुर्वी साळे,मुख्याध्यापक गुरूदेव स्वामी, प्राथमिकचे मुख्याध्यापक गोरखनाथ भोसले, शिवदास पुजारी ,सुरेश चव्हाण, संतोष क्षीरसागर ,नितीन सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक संग्राम दुधाळ, शिवाजी काशीद, जगन्नाथ काटकर आदी सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताता संस्थाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अंगात प्रत्येक कला आणि क्रीडा गुण असतो त्या क्रीडा गुणांना वाव देण्याचे दृष्टीने संस्थेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत भविष्यातील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना गावापासून लांब जावे लागणार नाहीत महाविद्यालयीन शैक्षणिक सुविधा या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून होणारी गैरसाय बंद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, लंगडी, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भालाफेक स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन हनुमंत कोळेकर यांनी केले