पंढरपूर(प्रतिनिधी) पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते श्री सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांवर मोठे काम केलेले, व सामाजिक जीवनामध्ये सर्व जनतेबरोबर असलेले नाळ कायम ठेवणारे, पंढरपूर तालुक्यातील राजकीय पटलावरील अभ्यासू नेतृत्व म्हणून आज यांच्याकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय दबदबा अबाधित राखणारे, साखर कारखानदारीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व,व विविध पदे भूषवलेले माननीय वसंतनाना देशमुख यांचा दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता ६१ व्या वाढदिवसाचे निमित्त भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष सरकारी वकील माननीय उज्वल जी निकम साहेब, प्रमुख पाहुण्यांमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, रणजीत दादा मोहिते पाटील, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत मालक परिचारक, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे, राजनजी मालक पाटील, यशवंत तात्या माने आमदार मोहोळ, दिलीप मालक माने, राजेंद्र अण्णा देशमुख, बळीराम काका साठे, सांगली जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर, व प्रभाकर देशमुख साहेब यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमासाठी सोलापूर सांगली जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर सामाजिक जीवनामध्ये साखर कारखानदारी, शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी साखर कारखान्याचे आजी-माजी व विद्यमान चेअरमन यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभणार असून हा कार्यक्रम कासेगाव येथील, दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून हा कार्यक्रम ठीक पाच वाजता सुरू होणार असल्याचे माननीय वसंत नाना देशमुख नागरी सत्कार समिती व ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.