पुणे(प्रतिनिधी) भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांच्या गाडीचा मुंबई हायवेवर अपघात सुदैवाने यामधील कोणाला काही झाले नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामधील हकिकत असे की भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी बैठकी करीत मुंबई जात असताना 9 नोव्हेंबर 2023 पहाटे चार वाजता जात असताना त्याच्या वाहनाला मालवाह्तुक कंटेनर ने ओव्हरटेक करताना कट मारून गेल्याने कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने मुळा नदीच्या पुलावर असलेल्या डिव्हायडर वर गाडी वेगाने जाऊन आदळल्याने गाडीच्या पुढची दोनी टायर फुटून कार अपघात झाला. त्यात गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल आहे. गाडीत भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, प्रदेश सचिव ॲड. सुहास अरुण माळवे, संगम खडतरे, वाहन चालक दादा माळी सर्वजण सुदैवाने सुखरूप असून ते पुढील नियोजित बैठकीसाठी खाजगी वाहनाने मुंबईला रवाना झाले.
Check Also
Close