पंढरपूरमंगळवेढासोलापूर

एकाच कुटुंबाभोवती फिरते हिवरगाव 25 वर्षाचे राजकारण!

 

मंगळवेढा(प्रतिनिधी)ज्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीवर वीस वर्षांपूर्वी होणारी हाणामारी आणि त्याच गावात नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाल्याने या सर्व गोष्टीला फाटा देत ग्रामपंचायत निवडणूकीत सलग 5 व्या वेळी सत्ता हस्तगत करण्याची किमया केली खांडेकर कुटूबाने.

       आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपूर्वी या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कमी मतदान असल्यामुळे मतदाराचे मत खेचण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जात होत्या. त्यासाठी साम-दाम दंड भेद या गोष्टीचा वापर केला जात होता. त्यातून काही वेळेला वादावादीचे प्रसंग देखील झाले. छोट्या गावात निवडणुकीवरून होणारे वाद परवडणारे नाहीत म्हणून गावच्या  राजकारणाची दिशा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी गावातील सुशिक्षित तरुणांना एकत्र घेत ग्रामपंचायत ताब्यात घेतल्यानंतर या सर्व गोष्टीला फाटा दिला व गावातील राजकीय वैर व इतर गोष्टीत होणारा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. स्वतः पाच वर्षे सरपंच म्हणून काम करताना शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. आई जिजाबाई खांडेकर यांना बिनविरोध केले व  मंगल खांडेकर यांना देखील त्याच कार्यालयात सरपंच पदाची संधी देत राजकीय समतोल साधला त्यानंतर मागासवर्गीय आरक्षण सोडतील सुरेखा खरबडे यांना संधी दिली व मागील पाच वर्षात भाऊ रविकांत खांडेकर यांना संधी दिली. या गावाचे ग्रामदैवत असलेल्या कामसिद्ध देवाची यात्रा सार्वजनिक स्वरूपात कशा पद्धतीने नियोजनबद्ध करावे याचा आदर्श त्यांनी तालुक्याला खांडेकर बंधूंनी घालून दिला. सरपंच म्हणून प्रदीप खांडेकर यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता आ. समाधान आवताडे यांनी त्यांना सभापती पदाची संधी दिली या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या घरकुल सौभाग्य योजनेतून वीज, मनरेगा, शौचालय,यामध्ये  प्रभावी काम करून तालुक्याचा नावलौकीक करण्याचा प्रयत्न केला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भावजय कमल खांडेकर या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडल्या. मुक्ताबाई  बुरंगे, पूजा कुपाडे, महादेव वाघमोडे,  शशिकांत खांडेकर, पारूबाई वाघमोडे, अश्विनी लवटे या सदस्य बिनरोध झाल्या.एका जागेसाठी निवडणूक लागली मात्र या निवडणूकीत आता औपचारिकता राहिली. निवडणुकीपूर्वी अनेक मतदारानी त्यांच्यावर असलेली वैयक्तिक कर्ज किंवा इतर गोष्टीची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र प्रदीप खांडेकर यांच्या नियोजनबद्ध कौशल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीत आर्थिक लूट करणाऱ्या मतदारांना मात्र याची चपराक बसली आहे

गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन केलेले काम व आ. समाधान आवताडे यांनी दिलेली आपल्याला सभापती पदाची  याचा वापर करून योग्य समतोल सादर राजकारण केल्यामुळे सलग 25 व्या वर्षीही गावच्या राजकारणाची सूत्रे आमच्या घराभोवती फिरत राहिली.

प्रदीप खांडेकर,सदस्य ,जिल्हा नियोजन मंडळ

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close