मंगळवेढा(प्रतिनिधी)तालुक्यातील हुन्नूर येथील जय भवानी नवरात्र मंडळाने रेणुका माता माहूरगड (नांदेड) येथून 35 कार्यकत्यांनी 485 कि.मी अंतर पार करून आलेल्या ज्योतीचे स्वागत काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केले.
तालुक्यामध्ये साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामध्ये विविध मंडळाकडून उभारले जाणारे देखावे,सांस्कृतीक कार्यक्रम,विद्युत रोषणाई हे अप्रतिम असल्यामुळे नवरात्रातील दहा दिवस तालुक्यात कापड,किराणा,या व्यवसायासह इतर इतर व्यवसायात मोठी आर्थिक उलाढालाची संधी असते. शहरामध्ये अनेक मंडळाकडून प्रबोधनाची देखावे उभे केले आहेत त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात देखील मोठे देखावे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले. तालुक्यातील 82 मंडळाकडून तुळजापूर येथून ज्योत आणली जात आहे. तर काही मंडळानी यापूर्वी कोल्हापूर येथील ज्योत आणली जाते.परंतु हुन्नूर येथील जय भवानी नवरात्र या मंडळांने नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथील रेणूका माता देवीच्या मंदीरातून ज्योत आणण्याचा निर्णय घेतला.जवळपास 485 किलोमीटर अंतर 35 तरुणांनी पार करत आज मंगळवेढा येथे ही ज्योत आली असता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी सहभागी झालेल्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे फेटा बांधून सत्कार केला. यावेळी पुंडलिक साळे, मारुती वाकडे, भिमराव मोरे ,पांडुरंग माळी ,पांडुरंग निराळे, मनोज माळी, बापू अवघडे, सुनीता अवघडे, म्हाळाप्पा शिंदे, शहाजी कांबळे, बंडोपंत खडतरे, रविराज खडतरे
विष्णुपंत शिंदे,पांडुरंग जावळे ,संदीप पवार,ओम मुरडे आदी सह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
———
मंडळाच्या कार्यकर्त्यांसह मार्गदर्शक प्रशांत साळे यांच्या इच्छेनुसार यंदा नांदेड वरून ज्योत आणण्याची इच्छा व्यक्त केली. 35 कार्यकर्त्यांसमवेत 485 किलोमीटर अंतर पार करून ही ज्योत यशस्वीरित्या आम्ही आणली आहे.
बिराप्पा पुजारी,अध्यक्ष जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ