पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसामाजिक

मनोज जरांगे पाटलाच्या मेळाव्यास मंगळवेढा तालुक्यातुन समाजबांधव आंतरवलीकडे रवाना!

दत्तामामा भोसले यांच्याकडून अल्पोपहाराची सोय

मंगळवेढा(प्रतिनिधी) एरवी एखाद्या राजकीय पक्षाची सभा घ्यायची असली तर वाहनांची व्यवस्था करून वेळप्रसंगी रोजंदारीवर माणसे आणावी लागतात. मात्र जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत उद्या होणार्‍या विराट मेळाव्यास स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने प्रत्येक जण जाण्यासाठी सज्ज झाला आहे. हा मेळावा आजपर्यंतच्या सर्व मेळाव्याचे रेकॉर्ड मोडून विक्रमी होईल त्यामुळे मराठा बांधवांच्या सभेची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद होणार असल्याचा दावा मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. स्वत:चा संसार उघड्यावर टाकून मराठा समाजासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी आपण आपला एक दिवस द्यायचा आहे, असे आवाहन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा बांधवांना करण्यात आले आहे. दरम्यान आंतरवली कडे निघालेल्या हजारो समाजबांधवाना समाजसेवक दत्तामामा भोसले यांच्या कडून लाडू चिवड्याचे पाकीट देण्यात आले.
समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून झगडत आहे. सरकारने काही तज्ज्ञ जाणकारांनी सांगून देखील वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाला फसवले असल्याचे म्हटले आहे.आंतरावली येथील उपोषण कायद्याला धरून आहे.आधी मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करा, या पद्धतीचे आहे. त्यामुळे समाजातील युवकांना कुठेतरी आता आपल्याला आरक्षण मिळेल असे वाटत आहे. परंतु, सरकारने जरांगे यांना चाळीस दिवसांचा अवधी दिला होता. तो काही दिवसांत संपणार आहे. १४ ऑक्टोबरला आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी व आरक्षण समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जवळपास दीडशे एकर जागेमध्ये मेळावा होणार आहे. या सभेस मंगळवेढा तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने महिला,पुरुष,युवक जाणार आहेत.आपल्याला सभास्थळी व्यवस्थित पुढे जागा मिळावी यासाठी काही मराठा तरुणांची फौज शुक्रवारी रवाना झाली आहे. बहुतांश तरुण आपापल्या गावातून शनिवारी पहाटे ३ ते ४ निघाले आहेत. प्रत्येक जण आपल्या सोबतच्या बांधवांची काळजी घेत आहेत. प्रत्येकजण या मेळाव्यासाठी आपले योगदान देत आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close