
मंगळवेढा(प्रतिनिधी) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची मंगळवेढा शहरात जाहीर सभा होणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाकडून अनेक वर्षांपासून विविध प्रकारे सरकारकडे मागणी केली जात असताना देखील याचा अद्याप पर्यंत निर्णय झाला नाही सरकारने कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी अपेक्षित प्रयत्न न केल्याने आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही ही भूमिका ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले व हा विषय राज्यभरात चर्चेचा झाला यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने उभी राहिले सरकारने आंदोलन स्थळी लाठीचार्ज केल्याने मराठा समाजाचा उद्रेक झाला याबद्दल सरकारला दिलगिरी व्यक्त करावी लागले यानंतर मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आरक्षण मिळेल यासाठी सर्व मराठा समाजाला कुणबी ग्राह्य धरावे ही मागणी समोर आल्यानंतर सरकारने समिती नेमली असून उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले मात्र सरकारला 40 दिवसांचा अवधी दिला असून दरम्यानच्या काळामध्ये पाटील राज्यभरात फिरत आहेत मराठा आरक्षण प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये मराठा समाजाने विविध प्रकारे आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले व आंदोलनाची धग कायम ठेवली असल्याने सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेण्याचे निश्चित केले ही सभा सायंकाळी शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजार पटांगणात होणार असून या सभेपूर्वी शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा सादर केला जाणार आहे या सभेसाठी सांगोला तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या लोकांना वाडेगाव या ठिकाणाहून एकत्रित मंगळवेढ्याच्या सभेला येण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.